मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातातील जखमींना मदतीचा हात; मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात भेट देत घेतली जखमींची प्रकृतीची माहिती - दैनिक शिवस्वराज्य

मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातातील जखमींना मदतीचा हात; मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात भेट देत घेतली जखमींची प्रकृतीची माहिती

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या दुर्दैवी लोकल अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्याचे  मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयांना भेट देत जखमी प्रवाशांची प्रकृतीची विचारपूस केली.
महाजन यांनी रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधून सर्व जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले. कोणत्याही प्रकारची कसूर न ठेवता उपचार व सेवा देण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या सोबत  श्री. निरंजन डावखरे,  श्री. अनुप अग्रवाल (अनुप भैय्या अग्रवाल), तसेच श्री. अमोल हरिभाऊ जावळे उपस्थित होते.या अपघातामुळे स्थानिक पातळीवर चिंता व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.




Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads