जामनेर पोलीस स्टेशन कर्तव्यदक्ष दोन पोलीस उपनिरीक्षक यांची बदली.... - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर पोलीस स्टेशन कर्तव्यदक्ष दोन पोलीस उपनिरीक्षक यांची बदली....

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 जामनेर पोलीस ठाण्यातील दोन अत्यंत कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय उपनिरीक्षकांनी आपल्या कार्यशैलीने शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवताना नागरिकांचा विश्वास संपादन केला होता. आता या दोघांची बदली झाली असून जामनेरकरांनी भावनिक निरोप दिला आहे.

उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे यांची बदली नाशिक येथे तर उपनिरीक्षक सागर काळे यांची बदली अहिल्यानगर येथे झाली आहे. शिवस्वराज्य न्यूजचे प्रतिनिधी नितीन इंगळे यांनी दोघांची खास भेट घेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या दोन्ही अधिकाऱ्यांनी जामनेर शहरात कडक शिस्त लावून गुन्हेगारीला चाप लावण्याचे मोलाचे कार्य केले आहे. गुन्हे उघडकीस आणण्यात, समाजकंटकांवर वचक बसवण्यात, तसेच कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यात त्यांचा वाटा संस्मरणीय ठरला आहे.
असे अधिकारी पुन्हा लाभणे कठीण – अशीच भावना अनेक जामनेरकर नागरिकांनी व्यक्त केली. केवळ कायदा नव्हे, तर समाजाशी जोडलेपण, माणुसकी आणि कार्यतत्परता ही त्यांची खरी ओळख ठरली.
जामनेरमधील सेवा संपली असली तरी हे दोन्ही अधिकारी जिथे जिथे जातील तिथे आपल्या कार्याची अमिट छाप सोडतील, असा विश्वासही शहरवासीयांनी व्यक्त केला.
शिवस्वराज्य न्यूज परिवारातर्फे उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे व उपनिरीक्षक सागर काळे यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads