पत्नी व मुलगा घरातून बेपत्ता – जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथील घटना - दैनिक शिवस्वराज्य

पत्नी व मुलगा घरातून बेपत्ता – जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथील घटना

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील येथील पिंपळगाव गोलाईत येथून राहत्या घरातून पत्नी व मुलगा अचानक बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पती अरुण तायडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी कल्पना तायडे आणि मुलगा साहिल (वय 17) हे दोघेही 9 जूनपासून घरातून निघून गेले असून अद्याप परत आलेले नाहीत.

सदर दोघांनी घरातून निघताना त्यांच्या मुलीला ‘शेतात जाऊन येतो’ असे सांगितले होते. मात्र संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने तायडे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. नातेवाईक, मित्रमंडळी व ओळखीच्या ठिकाणी चौकशी केली असता कुठेही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

यानंतर अखेर आज अरुण तायडे यांनी पहूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कल्पना तायडे व साहिल यांच्याबद्दल कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ पहूर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा किंवा मोबाइल क्रमांक 9307629985 वर कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.सदर प्रकारामुळे परिसरात चिंता व संभ्रमाचे वातावरण पसरले असून तायडे कुटुंबियांवर काळजीचे सावट आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads