फत्तेपूर पोलिसांची कारवाई; गावठी दारूच्या दोन भट्ट्या केल्या उद्ध्वस्त देवळगाव गुजरी भागात हातभट्टीच्या अड्यावर सपोनि अंकुश जाधव यांची मोठी छापेमारी - दैनिक शिवस्वराज्य

फत्तेपूर पोलिसांची कारवाई; गावठी दारूच्या दोन भट्ट्या केल्या उद्ध्वस्त देवळगाव गुजरी भागात हातभट्टीच्या अड्यावर सपोनि अंकुश जाधव यांची मोठी छापेमारी

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील सट्टा पत्ता व हात भट्ट्याची दारु असा अवैध धंदाला मोठा ऊत आला होता राजमल हजारी चव्हाण जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक व VJNT सरचिटणीस राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मुंबई सिनेमा टुरिंग टॉकीज आसोशियन उपाध्यक्ष मुंबई व पत्रकार तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष संजय जटाळे यांनी फत्तेपूर पोलिस स्टेशन उपोषणाचा कडक इशारा देताच फत्तेपूर पोलिस स्टेशन झोपेतून खडबडून जागे झाले आणि फत्तेपूर पोलिसांची सपोनि अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने मोठी कारवाई करून दोन गावठी दारू भट्ट्या देऊळगाव गुजरी परिसरात केल्या उद्ध्वस्त 
येथील हातभट्टीच्या अड्यावर फत्तेपूर पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीत गावठी दारू तसेच दारू तयार करण्यास लागणार लिटरचे रसायन असा मुद्देमाल जप्त केला. तर काही जागेवर रसायन नष्ट करण्यात आले आहे व दोघांना अटक केली आहे.शमीरखाॅ कासमखाॅ वय ५६ वर्ष,मनोज शामीर तडवी वय २५ वषॅ दोन्ही राहणार देऊळगाव गुजरी यांच्या हात भट्ट्या फोडून कच्चे/पक्के रसायनचा सीए सपल करीता नमुना काढून इतर माल जागेवर नष्ट करुन फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फत्तेपूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सपोनि अंकूश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रवीण चौधरी, पोलिस हवालदार गणी तडवी, पोलिस अंमलदार मनोज पाटील 
यांच्यासह पथकाने केली.देवळगाव गुजरी परिसरात अवैध धंदे बंद करण्याचे वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे आदेशाचे पालन पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अंकुश जाधव व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान देऊळगाव गुजरी परिसरात येथील दोघेजण गावठी हातभट्टी दारू गाळण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून या भागात छापा टाकला.त्याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 94/2025 आणि 95/2025 महाराष्ट्र दारु बंदी प्रतिबंधक अधिनियम 1949 चे 65 (फ) नुसार दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे यामुळे फत्तेपूर व देऊळगाव गुजरी परिसरात अवैध धंदा वाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads