विक्टर अकॅडमी येथील शिक्षकांचा सत्कार; परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवले झकास मार्क समाजवादी पार्टी, तालुकाध्यक्ष रऊफ शेख यांच्या हस्ते गौरव
जामनेर आपल्या मेहनतीनं विद्यार्थ्यांना NEET परीक्षेत छान यश मिळवून देणाऱ्या विक्टर अकॅडमी, जामनेर येथील आदिल सर, सिद्दीक सर आणि इस्माईल सर यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
या प्रसंगी समाजवादी पार्टीचे तालुका अध्यक्ष रऊफ शेख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी जाकिर बागवान आणि तनवीर बागवान हेही खास उपस्थित होते.
या शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ म्हणून यंदाच्या NEET परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी उच्च गुण मिळवलेत. गावाकडं शिकूनही मोठ्या शहरांमधल्या क्लासेसना टक्कर देणारे निकाल पाहून पालक आणि विद्यार्थी दोघंही खुश आहेत.
रऊफ शेख यांनी यावेळी सांगितलं, "गावात बसून डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या मुलांचं बोट धरून हे शिक्षक त्यांना पुढं नेतायत. अशा लोकांचा सन्मान करणं ही अभिमानाची गोष्ट आहे."
विक्टर अकॅडमी ही आता फक्त जामनेरपुरती मर्यादित न राहता, संपूर्ण तालुक्याला दिशा दाखवणारी संस्था बनत चालली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा