महाराष्ट्र
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
आम्हाला पैसे का मागतो म्हणून बंकलगी येथील इसमावर कोयत्याने केला वार
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी येथील रहिवासी फिर्यादी गुरुनाथ शिवशंकर कोणदे (वय वर्षे 33 ) यांना बंकलगी गावातील बसवेश्वर मंदिराजवळ सोमवार,दि.30 आँगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपी शब्बीर अल्लादिन नदाफ आणि मशाक गुड्डू भाई नदाफ (दोघे राहणार बंकलगी तालुका दक्षिण सोलापूर) या दोघांनी मिळून फिर्यादीस तु पैसे आम्हाला का मागतो? तू कोणाला पैसे दिलास त्यांना विचार,असे म्हणुन यातील आरोपी शब्बीर यांने हातात आणलेल्या कोयत्याने फिर्यादीस डाव्या हातावर मारल्याने डाव्या हाताचे पंजाला मार लागुन जखमी झाला आहे.तसेच फिर्यादीस शिवीगाऴ करुन दमदाटी केली आहे
दोन्ही आरोपींविरुध्द भारतीय दंड विधान कलम 324, 323,504,506,34 प्रमाणे वळसंग पोलीस ठाण्यात रविवार,दिनांक 30 आँगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक तपास पोलीस नाईक मुल्ला हे करीत असल्याची माहिती वळसंग पोलीसांकडून मंगळवारी पत्रकारांना देण्यात आलीय.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा