बोरेगाव परिसरात मुसळधार पाऊस, पुलावरून पाणी वाहत असल्याने बोरेगाव ते दर्शनाळ आणि डोंबरजवळगे बुऱ्हाणपूर वाहतूक बंद - दैनिक शिवस्वराज्य

बोरेगाव परिसरात मुसळधार पाऊस, पुलावरून पाणी वाहत असल्याने बोरेगाव ते दर्शनाळ आणि डोंबरजवळगे बुऱ्हाणपूर वाहतूक बंद



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी 

अक्कलकोट दि.९ जुलै : अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक सेवा बंद झाले परिसरात गुरुवारी दुपारी तीन ते सहा दरम्यान तीन तास वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला पावसामुळे बोरेगाव पितापुर नन्हेगाव धोत्री बुऱ्हाणपूर मुस्ती दर्शनाळ अरळी हन्नुर चप्पळगाव आदी गावातील शेतातील बांध फुटले आहेत यामुळे उगवण अवस्थेत असलेल्या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहेे बोरेगाव ते दर्शनाळ आणि डोंबरजवळगे बुऱ्हाणपूर व अकतनाळ पितापूर या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक सेवा बंद झाले यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावे लागले सोमवार ते गुरूवार सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे बोरेगाव परिसरातील हन्नुर दर्शनाळ अरळी पितापूर डोंबरजवळगे नन्हेगाव धोत्री बुऱ्हाणपूर आदी गावातील नाले ओढे भरून वाहत आहेत डोबरजवळगे आणि बोरेगाव येथील पाझर तलावातील पाण्याची पातळी वाढली आहे उडीद मूग सोयाबीन तूर सुर्यफुल आदी पिके पाण्याखाली गेली आहेत यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती पण सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत मुस्ती दर्शनाळ अरळी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे हरणा नदीला काही प्रमाणात पाणी आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads