जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रजिया महिला स्वयंसहायता बचत गटास ९ लाखांचा धनादेश - दैनिक शिवस्वराज्य

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रजिया महिला स्वयंसहायता बचत गटास ९ लाखांचा धनादेश


प्रतिनिधी बालाजी गोरे

परभणी, दि.9: महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) परभणी द्वारा अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत रजिया महिला बचत गटाला उद्योग व्यवसाय करीता एकुण 9 लाख रुपयांचा बँकेच्या कर्जाचा धनादेश परभणीचे जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर यांच्या हस्ते देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या कक्षात झालेल्या या कार्यक्रमास महापालिका आयुक्त देविदास पवार, माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती निता अंभोरे, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे एकनाथ कांबळे, कार्यक्रम अधिकारी प्रकाश दवणे, नयी रोशनीच्या व्यवस्थापक श्रीमती जयश्री टेहरे, श्रीमती मीरा कराळे यांच्यासह रजिया महिला स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती रजिया बेगम शेख रफीक, सचिव श्रीमती अख्तर बेगम शेख आदी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads