महाराज
कंदलगाव येथे लोकमंगलच्या कृषी दुतांकडून छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा.......
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप ): कंदलगाव येथे दिनांक 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त गावचे सरपंच सौ शारदाबाई पंडित कडते यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिवस साजरा करण्यात आला.
लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय वडाळा उ. सोलापूर मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांचा ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम दिनांक २ जून 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील कंदलगाव या गावांमध्ये सुरू झालेला आहे, त्या अंतर्गत आज कृषी दुतांकडून गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिवस साजरा करण्यात आला . यावेळी सरपंच शारदाबाई पंडित कडते व उपसरपंच अमित जकाप्पा नरोटे तसेच कृषी दूत गणेश हातेकर , करण डुचाळ , अनिकेत क्षीरसागर, नागेश मोरे, गुरुप्रसाद भारती, उपस्थित होते. हा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन फुगे सर तसेच प्राध्यापिका स्मिता धायगुडे व प्राध्यापक प्रतीक मोघे यांचे मार्गदर्शन लाभले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा