संकल्प से सिद्धी तक" अभियानासाठी भाजप जळगाव जिल्हा कार्यशाळा संपन्न –मंत्री गिरीश महाजन, राजू भोळे यांची प्रमुख उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या यशस्वी ११ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त भाजपने देशभरात "संकल्प से सिद्धी तक" हे विशेष अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज जळगाव येथे भाजप जिल्हा कार्यशाळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली.
जळगाव येथील ब्राह्मण सभा सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन व आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे विभागीय कार्यशाळा झाली होती, त्यानंतर ही जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत प्रदेशातून आलेल्या पाच महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी आगामी कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीस पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ सूर्यवंशी, प्रदेश सचिव अजय भोळे, लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, माजी जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर, तसेच प्रदेश पदाधिकारी सुरेशभाऊ धनके, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, उज्वलाताई बेंडाळे, मीनाताई तडवी, केतकीताई पाटील, रेखाताई वर्मा, आणि युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा भैरवीताई वाघ हे मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय जिल्हा सरचिटणीस अतिशभाऊ झाल्टे, राकेशभाऊ पाटील, हरलालभाऊ कोळी, परीक्षितभाऊ बराटे, जितुभाऊ मराठे, नवलभाऊ पाटील, राजुभाऊ सोनवणे, अमोलभाऊ पाटील, विशाल भाऊ त्रिपाठी यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेतून आगामी काळात पक्षाचे ध्येय धोरण अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला असून, संकल्प ते सिद्धी या अभियानाद्वारे प्रत्येक बूथवर भाजपची ताकद वृद्धिंगत करण्याचा निर्धार करण्यात आला.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा