लोकनेते कै. बाबुराव (अण्णा) पाटील सर्वांगीण विकास प्रशालेचे मुख्याध्यापक औदुंबर बंडगर यांचा सेवापूर्ती समारंभ व आजी-माजी विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा संपन्न..... वडापूर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा.... - दैनिक शिवस्वराज्य

लोकनेते कै. बाबुराव (अण्णा) पाटील सर्वांगीण विकास प्रशालेचे मुख्याध्यापक औदुंबर बंडगर यांचा सेवापूर्ती समारंभ व आजी-माजी विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा संपन्न..... वडापूर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा....



समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील लोकनेते कै. बाबुराव (अण्णा) पाटील सर्वांगीण विकास प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते मुख्याध्यापक औदुंबर बंडगर यांचा सेवापूर्ती समारंभ व आजी-माजी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे. 
       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा बाल विकास समितीचे फाउंडर मेंबर चंद्रसेन कांबळे होते. व्यासपीठावर जकराया कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, संस्थेचे सचिव दर्शन वाघचवरे, राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक सुरेश कांबळे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, अरुण पाटील, प्रदीप पाटील, मुख्याध्यापक औदुंबर बंडगर आदी उपस्थित होते. याप्रसंगी आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र, शाल व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर मुख्याध्यापक औदुंबर बंडगर यांचा सेवापुर्ती निमित्त संपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी नितीन पाटील, शशिकांत पाटील, सुनील गरड, प्रियंका गुंड या माजी विद्यार्थ्यांनी मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. 1986 ते 2025 या 39 वर्षाच्या कालावधीतील विद्यार्थी एकत्रित आल्याने विचारांची देवाण-घेवाण झाली. मान्यवरांनीही संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत प्रशालेला उज्वल भविष्य असल्याचे कथन केले. कार्यक्रमास शिक्षक डी. ए. पवार, कर्मचारी कदम व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन साळुंखे व डॉ. महेश पाटील यांनी केले तर आभार संतोष भोसले यांनी मानले. 


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads