महाराष्ट्र
प्रभाकर क्षीरसागर यांचे निधन
प्रतिनिधी:रविना यादव
सातारा येथील शाहूपुरी मधील जिल्हा परिषद कॉलनीतील रहिवासी व सातारा जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील निवृत्त अधिकारी प्रभाकर यशवंत क्षीरसागर (वय 75) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी सातारा जिल्हा परिषदेसह कोरेगाव, वाई ,सातारा येथील पंचायत समितीमध्ये सेवा केली होती. त्यांच्यामागे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. कोरेगाव पंचायत समितीतील विस्तार अधिकारी , लेखक, साहित्यिक यशेंद्र क्षीरसागर यांचे ते वडील होत. सोनगाव ( ता. सातारा) हे त्यांचे मूळ गाव होय. प्रगतिशील शेतकरी म्हणूनही ते सुपरिचित होते. ते मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने सातारा जिल्हा परिषद मित्रपरिवार आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा