कातरखटाव ते कलेढोण रस्ता दुरुस्त करा - सुजाता महाजन - दैनिक शिवस्वराज्य

कातरखटाव ते कलेढोण रस्ता दुरुस्त करा - सुजाता महाजन



 प्रतिनिधी / रविना यादव
कातरखटाव ते कलेढोण रस्ता दुरुस्तीची मागणी खटाव तालुका राष्ट्रीय कॉग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुजाता महाजन यांनी वडूज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.देसाईसाहेब व सातारा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अशोकराव गोडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
         दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कातरखटाव ते कलेढोण हा २२ किलो मीटरचा रस्ता आपल्या विभागात असून त्याच रस्त्यावरती पडळ येथील साखर कारखाना आहे. तर कलेढोण येथे ग्रामीण रुग्णालय आहे. हा रस्ता रहदारीचा असून सध्यस्थितीमध्ये रस्त्याची दुरावस्था झाली असून आणि कारखाना ऊस वाहतुकीमुळे रस्ता अपूर्ण पडत आहे. त्यामुळे अपघात वाढत आहेत. तरी कातरखटाव ते कलेढोण हा रस्ता दुरुस्ती व रुंदीकरण व्हावे. यावेळी राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संजीव साळुंखे, जिल्हा चिटणीस भरत जाधव, खटाव तालुकाध्यक्ष डॉ विवेक देशमुख, खटाव - माण अध्यक्ष डॉ महेश गुरव,असंघटीत कामगार महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शारदा भस्मे, सौ. साळुंखे मॅडम आदि उपस्थित होते. कलेढोण - नियोजन मंडळ सदस्य अशोकराव गोडसे यांना निवेदन देताना सुजाता महाजन व इतर..
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads