भंडारकवठे येथे माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत गुरूवारी विकास कामांचे भूमिपूजन :- सरचिटणीस-यतीन शहा - दैनिक शिवस्वराज्य

भंडारकवठे येथे माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत गुरूवारी विकास कामांचे भूमिपूजन :- सरचिटणीस-यतीन शहा


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनीधी
भंडारकवठे (मंदूप): भंडारकवठे ता दक्षिण सोलापूर येथे गुरूवारी सकाळी नऊ वाजता विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार असुन या कार्यक्रमांस तालुक्याचे सभापती सोनाली कडते, भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, जिल्हा परिषद पक्षनेते अण्णाराव बाराचारी, जि.प.सदस्या प्रभावती पाटील,पंचायत समिती सदस्य  ताराबाई पाटील संदीप टेळे,शशीकांत दुपारगुडे, महादेव कमळे,रेखा नवगिरे,भंडारकवठेचे सरपंच चिदानंद कोटगोंडे,भाजपाचे जेष्ठ नेते हणमंत कुलकर्णी सर,तालुका भाजपाचे सरचिटणीस यतीन शहा,भिमाशंकर बबलेश्वर,प्रशांत कडते, गौरीशंकर मेंडगुदले,मळसिध्द मुगळे,सोमनिंग कमळे, मल्लेशा कस्तुरे, सुंदर पवार,महेश बगले, महादेव बिराजदार,दादा मेटगार, इरप्पा बिराजदार, रायप्पा बन्ने,दिपाली व्हणमाने, संगमेश बगले, अनिल नांगरे,मारूती कोळी, सुरेश बगले,भाऊ पाटील,यांच्यासह आदी उपस्थित राहणार आहेत.
  यामध्ये आमदार सुभाष बापु देशमुख यांच्या विषेश प्रयत्नातुन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन भंडारकवठे येथे भंडारकवठे ते संगमेश्वर नगर पर्यंत रस्त्यासाठी चार कोटी तीस लाख मंजुर करण्यात आले आहेत.याचे भूमिपूजन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
     या कार्यक्रमांस भंडारकवठे व परिसरातील नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस यतीन शहा यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads