आईच काळीज कापून खाणाऱ्या नरधमाला फाशीची शिक्षा, कोल्हापूरच्या माकडवाला वसाहतीतील घटना - दैनिक शिवस्वराज्य

आईच काळीज कापून खाणाऱ्या नरधमाला फाशीची शिक्षा, कोल्हापूरच्या माकडवाला वसाहतीतील घटना


राकेश कोळी उपसंपादक :-

आईने दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून घरामध्येच आईची निर्घून हत्या केली. त्यानंतर धारदार शस्त्राने आईचे एक एक अवयव धडापासून वेगळे केले. इतकच नाही तर आईचं काळीज कापून ते भाजून खाण्याचा प्रयत्न देखील केला होता. आईचा खून करून घृणास्पद कृत्य केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्य सत्र न्यायालयाने आरोपी सुनील रामा कुचकोरवी (वय ३५) ला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.


कावळा नाका येथील माकडवाला वसाहतीत राहणाऱ्या सुनील कुचकोरवी याने २८ ऑगस्ट २०१७ रोजी आईने दारूला पैसे दिले नाहीत म्हणून तिचा धारधार शस्त्राने खुन केला होता. यावेळी आरोपीने एवढ्यावर न थांबता तिच्या शरीराचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यातील काही अवयव हे तो भाजून खाण्याच्या तयारीत असताना शाहूपुरी पोलीसांनी अटक केली होती. त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी केला होता. या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग ४ चे महेश जाधव यांच्या न्यायालयात सुरू झाले. सरकार पक्षातर्फे एडव्होकेट विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सुनीलला दोषी ठरवले. त्याला जन्मठेप की फाशीची शिक्षा याबाबत दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाला होता. सुनील कुचकोरवीने केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे नमूद करत दुर्मिळातील दुर्मिळ घटना समजून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने या नराधमाला मरेपर्यंत फाशीची व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपी सुनील याला शिक्षा सुनावल्यानंतर कारागृहाकडे नेताना त्याचे चित्रीकरण करणार्‍या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना व त्याच्या नातेवाईकांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी संजय मोरे यांनी दिली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads