महाराष्ट्र
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सोलापूर जिल्हा दौरा
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-
सोलापूर दि. ८ जुलै : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, महाविकास आघाडी सरकार मधील राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांचा शुक्रवार दि. ९ जुलै रोजी दौरा जाहीर झालेला आहे. या दौऱ्याची सुरुवात माळशिरस तालुक्यातील चांदापुरी गावापासून होणार आहे.
पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांचे सकाळी ९:०० वाजता भरणेवाडी ता. इंदापूर येथून चांदापुरी ता. माळशिरस जि. सोलापूरकडे प्रयाण होईल. १०:०० वाजता चांदापुरी येथे आगमन होईल. याठिकाणी महालक्ष्मी वृक्ष लागवड प्रायव्हेट लिमिटेड पंढरपुर यांच्या मार्फत चेअरमन अरूण काळे यांनी एक लाख औदुंबर वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.
११: ०० वाजता चांदापुरी येथून पंढरपुर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पालखी आढावा बैठकीस ते उपस्थितीत राहणार आहेत.१२:३० वाजता पंढरपूर येथून मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी शताब्दी महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहून हिप्परगा ता. उत्तर सोलापूर या ठिकाणी दुपारी २:४५ वाजता हिप्परगा तलाव पाहणी व वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. उत्तर सोलापूर येथून सोलापूर येथे नियोजन भवन या ठिकाणी ३:२० वाजता कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ४ : ३० वाजता महिला हॉस्पिटल आसरा चौक येथील महिला हॉस्पिटल तिसरा दिनानिमित्त सुकन्या समृद्धी योजना तीन वर्षांमध्ये जन्मलेल्या मुलींना मोफत पी पी एफ खाते वाटप कार्यक्रमास उपस्थित राहून आसरा चौक येथून सायकाळी ६ : ०० वाजता इंदापूर तालुक्याकडे प्रयान होऊन इंदापूर येथील कैलासवासी रत्नाकर तात्या मुखरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून सायंकाळी भरणेवाडी ता. इंदापूर येथे आगमन होऊन मुक्काम राहणार आहे. असे विशेष कार्यअधिकारी डॉ. लहू वडापुरे यांनी पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांचा नियोजित दौरा जाहीर केलेला असून सदरच्या नियोजित दौऱ्याच्या प्रती जिल्हाधिकारी पुणे, सोलापूर, पोलीस आयुक्त पुणे, सोलापूर पोलीस अधीक्षक, पुणे-सोलापुर आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, निवासी उपजिल्हाधिकारी पुणे व सोलापूर अधीक्षक अभियंता पुणे व सोलापूर पशुसंवर्धन आयुक्त पुणे व अप्पर आयुक्त मृद व जलसंधारण प्रादेशिक विभाग पुणे यांना दौऱ्याचे नियोजन कळविलेले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा