राशिभविष्य
आजचे राशिभविष्य १०-०७-२०२१
आजचे राशिभविष्य १०-०७-२०२१
मेष :-
श्रीगणेश आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा देतील . तथापि विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल . नोकरी व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल . जवळपासच्या यात्रेचा योग येईल . भावंडांशी सलोखा राहील . त्याचा फायदा मिळेल . स्त्रियांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवा .
वृषभ :-
मनाची दोलायमान अवस्था महत्त्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल असे श्रीगणेश सांगतात . आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही . चर्चेत आपल्या फसव्या व्यवहारा संघर्ष निर्माण होईल . आर्थिक लाभ होईल . विद्यार्थ्यांना फार चांगला काळ आहे .
मिथुन :-
आजचा दिवस उत्साह आणि स्फूर्तीदायक आहे . स्वादिष्ट भोजन , सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र आणि आप्तयांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल . दांपत्यजीवनात सुखा - समाधानाची भावना राहील . आर्थिक लाभ आणि नियोजन यासाठी अनुकूल दिवस . खर्च वाढेल . त्यावर काबू ठेवा . नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात .
कर्क :-
परिवारात मतभेदाचे प्रसंग येतील . त्यामुळे मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल . द्विधा मनःस्थिती राहील . त्यामुळे महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाका . कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे . स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने तब्बेत बिघडेल . कोर्ट- कचेरीतील कामे जपून करा . मानहानी व धनहानी होण्याची शक्यता आहे .
सिंह :-
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल , पण मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या . स्त्री वर्गाशी मुलाकात होईल व ती लाभदायक ठरेल . वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील . घरात मंगल कार्ये होतील . मित्रांची भेट होईल व त्यांच्यापासून फायदा होईल . व्यापारवृद्धी होईल . नोकरदारांचे उत्पन्न वाढेल . बाहेर जाण्याचा बेत ठरवाल .
कन्या :-
श्रीगणेश कृपेने नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील . पित्या बद्दल आत्मीयता वाढेल . त्यांच्याकडून लाभ होईल . व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत जात राहतील . धन , मान- सन्मान वाढेल . सरकार कडून लाभ होईल . तब्बेत चांगली राहील . गृहस्थी जीवनात सुख शांती आणि सुसंवाद राहील . वसुली किंवा व्यावसायिक कामानिमित्त बाहेर जावे लागेल .
तूळ :-
बुद्धिवादी आणि साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल . नवीन कामे हाती घ्याल . दूरचे प्रवास किंवा तीर्थस्थानाला भेट .परदेशगमनाच्या संधी येतील व परदेश स्थित स्नेह्यांकडून वार्ता मिळतील . तब्बेत यथा तथाच राहील . संततीच्या समस्या मनात चिंता वाढवतील असे श्रीगणेश सांगतात .
वृश्चिक :-
श्रीगणेश सांगतात की उक्ती आणि कृती यांवर आज संयम ठेवा . दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका . आजारी पडण्याचा संभव आहे . खाणे - पिणे सांभाळा . अचानक धनलाभ होईल . आध्यात्मिक साधनेसाठी दिवस चांगला आहे . चिंतन - मनन यात वेळ घालवाल . त्यामुळे मानसिक शांती मिळण्या बरोबरच व्याधी दूर राहतील .
धनु :-
श्रीगणेश म्हणतात की पार्टी , पिकनिक , प्रवास , रुचकर भोजन , सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे . मनोरंजन विश्वात रमून जाल . भिन्न लिंगीय व्यक्तीशी रोमांचक मुलाकात होईल . दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल . सार्वजनिक सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल . बौद्धिक , तार्किक विचार विनिमय होईल . भागीदारी मध्ये लाभ होईल .
मकर :-
आजचा दिवस व्यापार धंद्यातील प्रगती आणि आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात . वसुली तसेच पैशांच्या देवाण घेवाणीत यश मिळेल . आयात - निर्यातीचा व्यापार करणाऱ्यांना फायदा होईल . घरात आनंदाचे वातावरण राहील . आर्थिक लाभ होतील . कायदेशीर बाबींसंबंधी सावध राहाल . तब्बेत चांगली राहील . विरोधकांचे प्रयास निष्प्रभ होतील .
कुंभ :-
मानसिक अशांतता आणि उद्विग्नता यांनी भरलेला दिवस आहे . सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही . ठोस निर्णय घेऊ शकणार नाही . संततीचे प्रश्न बेचैन करतील . पोटाच्या तक्रारी मुळे हैराण व्हाल . कामात अपयश आल्याने निराश व्हाल . पैसा अचानक खर्च होईल . साहित्य लेखनासाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात .
मीन :-
आजचा दिवस दक्षता बाळगण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत . कुटुंबीयांशी मतभेद होतील . आईची तब्बेत हा चिंतेचा विषय होईल . तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे . मानसिक उद्वेग , धनहानी आणि मानहानी होईल . नोकरीत समस्या उद्भवतील . स्थावर मालमत्तेचे व्यवहार करताना सावधानी बाळगा . स्त्रियां बरोबरचे संबंध हानीकारक सिद्ध होतील .
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा