महाराष्ट्र
अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याच्या मुर्त्यू खामगाव तालुक्यातील घटना
संतोष पाटील (कुळसुंदर )जिल्हा प्रतिनिधी
खामगाव तालुक्यात आज दुपारी
झालेल्या पावसात शेतकऱयांच्या अंगावर वीज कोसळून शेतकरी मृत्यूमुखी पडला ही घटना आवार येथे घडली. रामदास पांडुरंग मांजरे हे आपल्या शेतात पेरणी साठी गेले असताना दुपारी पाऊस सुरु झाला. पावसाचा बचाव करण्यासाठी शेतात असलेल्या झोपडीत गेले सोबत मजूर ही होते पण झोपडीत असताना त्यांना अचानक फोन आल्याने ते झोपडीच्या बाहेर आले आणि तेवढ्यात त्यांच्यावर अंगावर वीज कोसळली.
त्यांच्या सोबत असलेला शुभम कुउठकर हाही जखमी झाला दोघांनाही तातडीने खामगाव शहरातील सिल्वरसिटी हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तपासून रामदास मांजरे यांना मृत घोषित केले शुभमवर उपचार सुरु आहे
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा