महाराष्ट्र
अ भा छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने मंगळवेढा बोराळे मार्गातील लिंगेरी ओढ्यावरील पूल दुरुस्तीसाठी आमरण उपोषण
सलीम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी
मंगळवेढा : अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने मंगळवेढा बोराळे रोडवरील असलेले लिंगेरी ओढ्याचे पूल दुरुस्तीसाठी मंगळवेढा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या उपोषणास अ भा छावा मराठा युवा संघटना जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष जमीर इनामदार जिल्हा संघटक मनोज चव्हाण उपोषण करते युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण घाडगे तालुकाध्यक्ष सुरज फुगारे युवा तालुकाध्यक्ष बालाजी धनवे ,सागर धनवे ,प्रशांत नकाते ,ओंकार कोळी ,राज गवळी, आदिनाथ शिंदे ,बबलू रोकडे ,दीपक शिंदे ,चेतन गायकवाड व युवा कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी सांगण्यात आले की 28- 6- 2021,रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन संबंधित अडचणी सांगितल्या होत्या परंतु आमच्या पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले. लिगेरी ओढ्यावरील पुलावरून मंगळवेढा तालुक्यातील पूर्व भागातील अरळी ,सिद्धापूर, बोराळे,तांडोर,तांमदडी, मुंडेवाडी या गावातील लोकांचे नेहमीच वर्दळ या मार्गाने होत असते त्यामुळे खराब झालेला ओढ्यावरील पूल दुरुस्तीसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने आमरण उपोषण केले. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माघार नाही आम्ही आण्णासाहेबांचे छावे आहोत असे उपोषण कर्त्याने सांगितले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा