राशिभविष्य
आजचे राशिभविष्य ०९-०७-२०२१
आजचे राशिभविष्य ०९-०७-२०२१
मेष :-
आरोग्य श्रीगणेशांच्या दृष्टीने आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी आहे . नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळेल व नवीन कार्याचा आरंभ कराल . मनात शीघ्र होतील व मन द्विधा बनेल . आज नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल . निश्चित हेतूने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल . छोटे प्रवास होतील . महिलांनी आज वाणीवर संयम ठेवावा असा श्रीगणेशांचा सल्ला आहे .
वृषभ :-
हाती आलेली संधी अनिर्णायकतेमुळे आपण आज गमावून बसाल आणि संधीचा लाभ घेता येणार नाही असे श्रीगणेश सुचवितात . विचारांत व्यस्त ल . त्यामुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही . एखादे नवीन काम सुरू करणे हितावह नाही . वादविवाद अथवा चर्चेत आपल्या हटवादीपणामुळे संघर्षीची शक्यता आहे . आपल्या वाकचातुर्यामुळे इतरांना शांत करू शकाल . भावंडांमध्ये प्रेमभाव राहील .
मिथुन :-
श्रीगणेश यांना वाटते की आज आपल्या दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन आणि स्वस्थचित्ताने होईल . मित्र आणि नातलगांसोबत सहभोजनाचा आनंद लुटाल . सुंदर वस्त्रे परिधान कराल . आर्थिक दृष्टीने लाभदायक दिवस . खर्चावर नियंत्रण ठेवा . मनातून नकारात्मक विचार काढून टाकण्याची सूचना श्रीगणेश देतात . मित्र तथा प्रिय व्यक्तिंकडून भेटवस्तू मिळाल्याने मन आनंदी बनेल .
कर्क :-
मानसिक अस्वास्थ्य जाणवेल . कोणताही अंतिम निर्णय घेऊ शकणार नाही . असमंजसपणामुळे मनाला यातना होतील . संबंधितांचे गैरसमज होतील . बाबींवर खर्च होईल . भांडण , मारामारी यांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात . समस्या त्वरित सोडवाल . अपघातापासून सावध राहा . अविचारी वर्तना पासून दूर राहाणे हिताचे ठरेल . आरोग्य बिघडेल आणि पैसा खर्च होईल .
सिंह :-
आजचा दिवस फार चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात . तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी गमावाल असा इशारा श्रीगणेश देतात . मन विचारात गढून जाईल . नवे कार्य हाती घेऊ नका . मैत्रिणींची भेट होईल आणि त्यांच्याकडून लाभही होईल . मित्रांबरोबर सहलीचा बेत आखाल . त्यात फायदा होईल . धनलाभ होईल .
कन्या :-
गणेशजी म्हणतात की आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे . नवीन कार्ये आज सफल होतील . व्यापारी व नोकरदार वर्गासाठी फायद्याचा दिवस . त्यांना पदोन्नती मिळू शकते . वरिष्ठ अधिकार कडून फायदा होईल . पैसा , मान - सम्मान मिळेल . वडिलाकडून फायदा . कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील . आरोग्य चांगले राहील . सरकारी कामे होतील . सरकार कडून फायदा होईल . ऑफिसकामासाठी बाहेरगावी जावे लागेल . कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील .
तूळ :-
आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात व्यग्र असाल , असे गणेशजी म्हणतात . नवीन कार्यारंभास शुभ दिवस दूरचा प्रवास , धार्मिक स्थळांना भेटीचा आज योग आहे . व्यवसाय धंद्यात फायदा . परदेशातील मित्रांचे समाचार मिळतील . सहकार्यांचे सहकार्य मिळेल . आरोग्य सांभाळावे . संततीविषयी द्विधा मनःस्थिती राहील . विरोधका बरोबर चर्चा सुरु करण्याची सूचना श्रीगणेश देतात .
वृश्चिक :-
आजचा दिवस सावधतेने घालविण्याचा सल्ला श्रीगणेश देतात . नवीन कार्याची सुरुवात करु नका . तसेच रागावर नियंत्रण ठेवा . अनैतिक कामकृत्या पासून दूर राहा . राजकीय गुन्ह्यापासून दूर राहा . नवे संबंध जोडताना गांभीर्याने विचार करा . खर्च अधिक होईल . ईश्वरी आराधना व नाम स्मरणाने फायदा होईल .
धनु :-
आजचा आपला दिवस आनंदात व समाधानात जाईल असे श्रीगणेश सांगतात . मनोरंजन , पार्टी , पिकनिक , प्रवास , सुग्रास भोजन व सुंदर वस्त्र प्रावरणेही आजच्या दिवसाची विशेषता असेल . रोमांचक गाठीभेटी होतील . लेखन कार्याला चांगला दिवस . बौद्धिक विचारांची देवाणघेवाण होईल . भागीदारीत फायदा . प्रसिद्धी मिळेल . वैवाहिक सुख उत्तम राहील .
मकर :-
व्यापार धंद्यात वाढ होईल असे श्रीगणेश सांगतात . त्यादृष्टीने पुढे वाटचाल करा . पैशाचे व्यवहार सहज होतील . घरातील वातावरण आनंदी असेल . आवश्यक ठिकाणीच पैसा खर्च होईल . नोकरीत सहकार्यांकडून सहकार्य मिळेल . व्यापार्यांना कायदेशीर त्रास संभवतो . परदेशाशी व्यापार वाढेल . शत्रूवर मात कराल . आरोग्य चांगले राहील .
कुंभ :-
आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करण्याची सूचना श्रीगणेश देतात . आज विचारात बदल दिसून येईल . महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा . प्रवास शक्यतो टाळावेत . संतती विषयी काळजी राहील . लेखन व नवनिर्माण या कामासाठी चांगला दिवस . बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल . अचानक खर्चाचे योग आहेत . पोटाच्या तक्रारीची काळजी घ्या .
मीन :-
नावडत्या घटनांमुळे आजचा दिवस उत्साहात जाणार नाही असे श्रीगणेश सांगतात . कुटुंबात वादविवाद होतील . आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल . मन नाराज राहील . स्वास्थ्य बिघडल्याने झोप लागणार नाही . स्त्रियांबरोबर व्यवहार करताना काळजी घ्या . पैसा आणि कीर्ती यांची हानी . नोकरदारांना नोकरीत चिंता . स्थावर मालमत्ता , वाहन यासंबंधीच्या कागदपत्रांविषयी सावधानता बाळगा .
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा